ताज्या बातम्या

पालकर कुटुंबियांतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

कोकण ( दिपक कारकर ) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुवे नं.२,ता.लांजा,जि.रत्नागिरी सदर शाळेला सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत या कार्यक्रमाचे औचित्य साधून सोमवार दि.३० जून २०२५ रोजी कुवे गावचे भूमिपुत्र व ज्या शाळेत त्यांची देखील शैक्षणिक जडण-घडण झाली असे श्री. चंद्रकांत पालकर व समस्त कुटुंबिय यांसकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना प्रोत्साहन मिळावे,त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी ही विचार कल्पनेने प्रेरणादायी असा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.उपक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक सौख्य राखणाऱ्या पालकर कुटुंबिय यांचे पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top