Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रसातारा नगरपालिकेच्या हद्दीतील मटक्याला अधिकृत कोण करणार?

सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील मटक्याला अधिकृत कोण करणार?

सातारा(विशेष प्रतिनिधी) : सातारा शहर हे पेन्शनरचे शहर होते. आता ते दोन नंबरच्या व्यवसायाने व्यापले आहे. गल्लीबोळातील जागा मिळत नसल्याने आता थेट सातारा नगरपालिकेच्याच कार्यालया भोवती मटक्याच्या टपरी सुरू होत्या. त्या बंद करण्यात आले असून मटक्याला अधिकृत कोण करणार ? असा प्रश्न चक्री – मटका उघडपणे पाहणारे व खेळणाऱ्यांना पडला आहे.
सातारा नगरपालिकेची हद्द वाढ झाल्यामुळे खऱ्या अर्थाने दोन नंबरच्या व्यवसायिकांनी सुद्धा आपले हद्द वाढवून घेतलेली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेला खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. महागाई व घराच्या कर्जाचा हप्ता, वाहनांचा हप्ता, शैक्षणिक शुल्क, संसाराचा गाडा हा वेतनात भागत नाही. त्यामुळे हप्ताहप्त्याने कर्ज फेडावे लागते. पूर्वी हे काम कार्यालयातील ऑर्डरली करत होता. आता अधिकाऱ्यांना सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मैदानात उतरावे लागत आहे. त्यातूनच मग एखाद्या जागरूक पत्रकारांनी धाडसा वृत्त केले की दोन नंबरचे धंदे बंद करायचे. जणू काही एस.पीं.च्या ऑर्डर पेक्षा अशा धाडसी पत्रकाराची लेखणी व चित्रीकरण हाच आदेश आता समजत आहे. ही पण चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल यंत्रणेचे कौतुक करणे गरजेचे आहे.
साताऱ्यात कायद्याचा मस्का लावल्याशिवाय व्यवस्थेचा ब्रेड चांगला लागत नाही. याचा छोट्या मोठ्या आंदोलकांनी धसका घेतला आहे. पण अति मस्का लावल्यामुळे चव बिघडते. याची आता चर्चा सुरू झालेली आहे. समाज माध्यमावर याबाबत प्रकाश टाकला जात आहे.
साताऱ्यात खबऱ्यांचे जाळे नसले तरी दोन नंबरच्या व्यवसायिक स्पर्धेमुळे अनेकजण एकमेकांवर जळत असतात. पण, साताऱ्यात आता पोलीस यंत्रणेची धाड पडत असली तरी जलो मगर दीपक की तरह… असा काही मटके – चक्री धंद्याशी निगडित वंशाचा दिवा सल्ला देण्यास विसरले नाहीत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत.
सातारा शहरातील समाज माध्यमाच्या जागरूकतेनुसार नगरपालिका पाण्याच्या टाकी शेजारी, राजवाडा मंडई, सुमित्रा राजे शॉपिंग सेंटर, पंचायत समिती सातारा, बस स्थानक, काँग्रेस भवन शेजारी, राधिका रस्ता, गुरुवार परज, बुधवार नाका, मोळाचा ओढा, महामार्ग लगत आणि सैदापूर, वाडे फाटा, गोडोली नाका, बॉम्बे रेस्टॉरंट अशा अनेक ठिकाणी चक्री व मटका जुगार राजरोसपणाने सुरू आहे. महिन्यातून एक ,दोन निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते हळू आवाजात का होईना पण चर्चा घडवून आणतात. पुन्हा तो चक्री मटका सुरू व बंद स्वीच बटन लावून सन्मान राखतात.
भागवत एकादशी दिवशी रविवारी दि.२२ जून रोजी सातारा येथील प्रसिद्ध अशा राजवाड्या नजीक सातारा नगरपालिकेचे कार्यालयाच्या आवारात काही आजी-माजी नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने गेले अनेक महिने मटका जुगार सुरू होता. त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन करून आखो देखा हाल . धाडसी पत्रकार महेशरावांनी तब्येत सांभाळून दाखवून दिले. सातारच्या या पत्रकारितेची ही बाजू समाजाने स्वीकारली आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी हा शासनाचा अधिकृत व्यवसाय आहे. मग, मटका जुगारला वेगळ्या न्याय का? त्यामुळे बहुदा सातारा नगरपालिका हद्दीतच ओपन ठेवलेला मटका पोलिसांनी क्लोज का केला? असा प्रश्न आता पडू लागलेला आहे. दरम्यान, सातारा नगरपालिका कार्यालयाच्या हद्दीत घडलेल्या प्रकाराची तक्रार खरं म्हणजे प्रामाणिक व निस्वार्थी अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. असे घडले नाही. अन्यथा, राजकीय हस्तक्षेपामुळे पुरावा नसता तर ऑपरेशन करणाऱ्या पत्रकारावरच शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल झाला असता असे काहीना वाटू लागले आहे. अशी ही साताऱ्याची तऱ्हा झाली आहे. हे मात्र उघड सत्य आहे.

_____________________________
फोटो — सातारा नगरपालिका कार्यालय शेजारी मटका नि

फटका..

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments