कराड(प्रताप भणगे) : पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने जिंती येथे रविवार २९ जून रोजी वृक्षारोपण व बीजरोपन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन, जिंती ग्रामस्थ, श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती आणि जिल्हा परिषद शाळा जिंती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध प्रकारची झाडे व रोपे लावून परिसर हिरवळीने नटवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बीज गोळ्या तयार करून परिसरातील मोकळ्या जागांमध्ये बीजरोपण केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण जपण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असून, ग्रामीण भागात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश यामागे होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन व स्थानिक नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले. भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली
.