पुणे -प्रतिनिधी : टाटा मोटर्स लिमिटेडचे जनरल मॅनेजर टी. सेतु रामलिंगम यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित २०२५ ची ९० कि.मी. अंतराची कॉमरेड्स मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाते आणि ती एक प्रतिष्ठित ९० किमीची अल्ट्रामॅरेथॉन आहे,
टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळणारे टी सेतू रामलिंगम यांनी ५० व्या वर्षानंतर धावण्यास सुरुवात केली. व्यस्त आणि जबाबदारीचे नोकरीतील पदावर कार्यरत असताना ही धावण्याचा सराव करत आवड जोपासली आहे. सातत्याने विविध ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग होतात. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या ९० कि.मी. अंतराची कॉमरेड्स मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.ही १२ तासांची वेळ मर्यादा असणारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ अशी सलग धावत रहावे लागणारी अत्यंत कठीण स्पर्धा सलग ११ तास ५८ मिनिटांत अवघी दोन मिनिटे बाकी असताना त्यांचे पहिले कॉमरेड्स मेडल मिळविले. हा फिनिश या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय समाप्तींमध्ये गणला जातो.
१९२१ पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी कॉमरेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वात कठीण रोड अल्ट्रा मॅरेथाॅन मानली जाते. दोन फुल मॅरेथॉन पेक्षा अधिक अंतर, खडतर चढ-उतार, उष्ण हवामान आणि कठोर १२ तासांची वेळ मर्यादा ही शर्यत हजारो धावपटूंना कसोटीला लावते, ज्यांपैकी अनेक जण ती पूर्ण करू शकत नाहीत. टी सेतू रामलिंगम यांच्या या कामगिरीबद्दल टाटा मोटर्स ग्रुपकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर टी सेतू रामलिंगम (वय ५८) या पुण्याच्या धावपटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत लौकिक वाढविणारी कामगिरी करून दाखवल्यात उदयोन्मुख धावपटूं समोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.