सातारा
(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जगप्रसिद्ध आहे. याच साताऱ्यामध्ये तालुक्याला सध्या सातारा तहसीलदार पद रिक्त असल्याने बराच खोळंबा सुरू आहे. त्यामुळे सातारा तहसीलदार कोणी देता का तहसीलदार? असं आता शेतकरी व विद्या विभूषित नागरिक मागणी करू लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्यातील मुख्यालय म्हणून सातारा कडे पाहिले जाते. अगुंडेवाडी ते झरेवाडी असं २१२ गावांचा महसुली कारभार सातारा तहसील कार्यालयातून होत असतो. याच कार्यालयामध्ये अनेक शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. परंतु, दुर्दैवाने सातारा तहसीलदार पद रिक्त असल्याने शैक्षणिक दाखल्यापासून ते दस्त नोंदणी आणि सातबारा मिळणे अशक्य झाले आहे. तसं पाहिलं तर सातारा तालुका म्हणजे पवन चक्क्या व जोडीला दगडी खाणी आणि पुढे नाले नदीकाठची वाळू असं आर्थिक बळ देणारी यंत्रणा आहे. चार भिंती त्याचबरोबर पाटेश्वर, सज्जनगड, धावडशी, अजिंक्यतारा याचबरोबर शिवथर, परळी, अटाळी, जांभे, कण्हेर ,कास पठार, बामणोली ,ठोसेघर, लिंब, गोवे, मर्ढे अशी बागायत व सुपीक तर दुसऱ्या बाजूला खडकाळ व पडीक जमीन तसेच गौण खनिज व नदीकाठचा परिसर आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागातील तहसीलदार पद रिक्त असल्याने सर्वांच्या आपापल्या परीने चुली पेटलेले आहेत. त्यामुळे सर्वत्र संतोष असला तरी गरजवंतांना असंतोष वाटत आहे. असेच म्हणावे लागेल. त्यामुळे सातारा तहसीलदार या पदासाठी आता गरजवंत व शेतकरी तसेच विद्या विभूषित लोक मागणी करू लागलेले आहेत. सातारा तालुक्यामध्ये नेत्यांची काही कमी नाही. आपल्या मर्जीतील अधिकारी आला की त्यांच्याकडून कामे करून घेण्यास अनेकांचा हातखंड आहे. नेत्याच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना तर कामे करून घेणे सोपे असते. पण, जनतेच्या अडचणीसाठी सातारा तहसीलदार पदाचा अधिकारी सापडत नाही. अशा तक्रारी आता ऐकू येऊ लागलेली आहेत.
सातारा जिल्ह्याला पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई लाभलेले आहेत. बरेच वर्ष पाटणला न्याय मिळाला नसल्यामुळे त्यांच्या संपूर्ण लक्ष हे पाटण तालुक्यावर असते. त्यामुळे जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना सातारा पेक्षा पाटणच्या प्रश्नावर लक्ष द्यावे लागते. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता सातारा तहसीलदार पदी निवड होणे. ही प्रशासकीय बाब की राजकीय बाब? यावर आता चर्चा सुरू आहे. चार-पाच जणांची नावे पुढे आली असली तरी कुणीतरी एकाची निवड करा. असे आता सांगावे लागत आहे.
सातबारा ऑनलाइन केल्यामुळे तो प्राप्त करण्यासाठी लॉक काढणे गरजेचे आहे. तहसीलदारांचा अंगठा जुळणे महत्त्वाचा आहे. सध्या सातारा तहसीलदार पद रिक्त असल्यामुळे अनेक दस्त व जमिनीचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे आता प्रभारी तहसीलदार तरी पाठवून द्यावा. अशी नाईलाजाने मागणी होऊ लागलेली आहे.
_____________________________
फोटो— तहसीलदार पद रिक्त असले तरी कामकाज करणारे कार्यालय…