ताज्या बातम्या

जीवनाच्या छायाचित्रांची भावस्पर्शी मांडणी : संजय हडकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लबमध्ये

मुंबई(सदानंद खोपकर) : मोठ्या घरातील मुलं अभ्यास सुरक्षित ठिकाणी करतात, बाहेर ज्यांचं शिकण्याचं वय ती मुलगी जोरावर काठी घेऊन, डोक्यावर तीन तांबे घेऊन , जगण्यासाठी आयुष्याची जीवघेणी कसरत करत आहे या अक्षरशः हृदयाला हात घालणा-या छायाचित्रांसह लक्षवेधी अशा संजय हडकर, डेप्युटी चीफ फोटोग्राफर,दे टाइम्स ऑफ इंडिया, यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात एकूण बावीस अप्रतिम छायाचित्रे मांडली आहेत.एक महिला छत्री घेऊन जाते आहे,छत्री आणि रस्त्याकडेची भिंत तितक्या मोकळ्या स्पेसमध्ये भिंतीवरील खोखो खेळणारे खेळाडू, बाद खेळाडू पडतानाचं चित्र, यांची उत्कृष्ट संगती छायाचित्रकार हडकर यांनी साधली आहे.एका चित्रात

पाणी पिणारा मुलगा आणि,झाडावरून तृषार्त पक्षी ते पाहतो नाइटलॅम्प लावून वाचनात गढलेली आनंदी युवती गरीब वस्तीतील मुलं क्रिकेट खेळत आहेत. पाऊस आहे.त्यांना एक पडद्याचं छान छत लाभलंय.त्यांच्या चेह-यावरील ते अवर्णनीय आनंद भाव छायाचित्रकाराला मोहित करणारे ठरलेत‌

नुकत्याच झालेल्या पावसात मुंबईची तुंबाई, त्यातून निघालेला बाईक स्वार, सोबत ,छत्रीधारी सहकारी ,

डासांचा उपद्रव रोखण्यासाठी धूर सोडणारा कामगार, धूराचे लोट, पण शेजारील मंडपावरील अष्टदुर्गामाता त्या धूरातून प्रकटतेय अशी भावूक एकात्मता

असंही एक सुंदर चित्र यात आहे. यातील प्रत्येक छायाचित्र अनमोल ठेवा आहे.

चित्ररसिकांसाठी तीन जूलैपर्यंत एक महिनाभर हे छायाचित्र प्रदर्शन पाहता येईल.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top