कराड (विजया माने) : श्री गणेश आखाडा मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक, अनेक नामांकन मिळवून श्री. गणेश आखाड्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्ल घडवून यशाच्या शिखरावर पोहचवनारे तसेच गोरगरीब मल्लांना हाताशी धरून मायेचा हात देणारे वस्ताद वसंतराव पाटील यांनी केलेल्या कार्य कर्तुत्वाची पोचपावती म्हणून त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१व्या अधिवेशन मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, अतिग्रे जिल्हा कोल्हापूर येथे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक नजरुद्दीन नायकवडी, मा. आमदार सुजित मिंचेकर, मा. आमदार राजु किसन आवळे व राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वस्ताद वसंतराव पाटील यांना फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी वसंतराव पाटील यांना मल्लयोद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.




