ताज्या बातम्या

बस मार्ग क्र. 45 खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज – 2 या मार्गाचा स्वप्नसागर गृहसंकुल, सेक्टर 34 पर्यंत विस्तार

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा बस मार्ग क्र. 45 हा खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज -2 शिवसेना कार्यालय अशाप्रकारे आसुडगांव आगारातून कार्यान्वित आहे. सदर मार्गामध्ये दि. 7 जून 2025 पासून करण्यात येत आहे. यानुसार –

खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज -2 शिर्के कॉलनी पर्यंत कोणताही बदल नाही.

तळोजा फेज – 2 शिर्के कॉलनीपासून पुढे मारवा से.22, धनश्री गृहसंकुल से.37, सिडको कॉलनी, आनंदसागर / सुखसागर गृहसंकुल, दिपसागर गृहसंकुल, स्वप्नसागर गृहसंकुल से.34 पर्यंत जातील व येतील.

प्रवाशांच्या मागणीनुसार व त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या बस मार्ग क्र. 45 मधील बदलांची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top