ताज्या बातम्या

ओंड येथे स्विफ्ट कार आणि ईरटीका कार यांचा भीषण अपघात.. अपघातात तिघेजण जखमी यामध्ये एका युवतीची प्रकृती गंभीर

कराड (प्रतिनिधी) ओंड ता.कराड गावच्या हद्दीत शनिवारी दि.३१रोजी सायंकाळी साडेचार च्या दरम्यान स्विफ्ट कार आणि ईरटीका कार चा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात तिघेजण जखमी झाले ,यामध्ये एका युवतीची प्रकृती गंभीर असून जखमींवर ,कृष्णा हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,शेडगेवाडी ते कराडला जाणारी स्विफ्ट कार mh11Bv 9696,आणि कराड वरून शेडगेवाडी साईडला जाणारी ईरटीका Gj21ce 1013 या दोन्ही गाड्या ओंड येथील हद्दीत आल्यानंतर सायंकाळी साडेचार च्या दरम्यान त्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये स्विफ्ट गाडीतील दोघेजण देविका राजेंद्र उपाध्याय रा. नवी मुंबई सध्या राहणार कारवे नाका कराड, अनिकेत राजेंद्र शेलार राहणार मंगळवार पेठ कराड, आणि ईरटीका गाडीतील एक तरुणी खुशी महेश दसाडिया वय २५ राहणार नवसारी गुजरात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ,हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुरा झाला आहे ,याबाबतची नोंद नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली असून याबाबतचा अधिक तपास हवालदार प्रशांत जाधव करत आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top