Thursday, July 31, 2025
घरमहाराष्ट्रवन्यप्राण्यांच्या हल्यात ५ बकऱ्यांचा मृत्यू, बागणी येथील घटना.

वन्यप्राण्यांच्या हल्यात ५ बकऱ्यांचा मृत्यू, बागणी येथील घटना.

बागणी(विजया माने) : बिरू भीमराव अनुसे रा. बु. वठार ता. हातकणंगले, हे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारणीसाठी बागणी ता. वाळवा येथे आहेत त्यांच्या मेढरांचा कळप बागणी येथील शेतकरी रवी गावडे यांच्या शेतात खतासाठी मेंढ्या बसविल्या असताना कोल्हासदृष्य वन्यप्राण्यांनी दि. ३०/५/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हल्ला करून ५ बकऱ्यांना ठार मारले, मेंढपाळ बिरू अनुसे यांनी ही घटना तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवले वाघमोडेसाहेब यांनी पशुसंवर्धन विभाग वन विभाग यांना घटनेची माहिती दिली व पंचनामा करण्याची विनंती केली.
घटनास्थळी भिवा कोळेकर वनरक्षक बावची, निवास उघळे विक्रम टेंबे विजय मदने वन सेवक, यांनी मृत बकऱ्यांचा पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर केंद्रे यांनी मृत बकऱ्याचे शवविच्छेदन व जखमी वर उपचार केले.
यावेळी बोलताना संजय वाघमोडे म्हणाले की वन्य प्राण्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने पशुपालक शेतकरी मेंढपाळ यांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी व रानातील वस्तीवरील पाळीव प्राण्यांना बंदिस्त ठेवण्यात यावे जेणेकरून वन्य प्राण्यांचे पासून त्यांना धोका निर्माण होणार नाही शासनजरी नुकसान भरपाई देत असेल तरी मिळणारी नुकसान भरपाई ही अतिशय कमी मिळत असून होणारे नुकसान मात्र जास्त होत आहे. वन्यप्राण्यांनी जंगलामधून सहज मिळणाऱ्या शिकारीमुळे गावाशेजारी ऊस क्षेत्रात आसरा घेतला आहे. त्यामुळे आपणच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी.
घटनास्थळी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना भिवा कोळेकर वनरक्षक बावची, निवास उघळे विक्रम टेंबे विजय मदने वन सेवक,
मेंढपाळ बिरू भीमराव अनुसे रवी गावडे बिरू सयाजी अनुसे सोमनाथ गावडे अरुण मारुती गावडे सतीश गावडे अजित गावडे अविनाश डाळे, भिवडाळे शंकर कचरे पिंटू गावडे पंकज अनुसे सुरेश अनुसे सागर शिरसाळे समर्थ शिरसाळे इत्यादी उपस्थित होते

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments