कारेगाव प्रतिनिधी: जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या मातोश्री कै. सौ. शांताबाई हरिभाऊ शेवाळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त कारेगाव येथे भावनिक आणि भक्तिमय वातावरणात कीर्तनसेवा पार पडली.
या प्रसंगी आवाजाचे जादुगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनसेवेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांताबाई शेवाळे यांना मान्यवर व ग्रामस्थांनी आदरांजली अर्पण केली.
भर पावसात देखील मोठ्या आपुलकीने आणि श्रद्धेने सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे नाथाभाऊ शेवाळे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी एमपीएससी चेअरमन किशोरराजे निंबाळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, माजी सभापती सुभाष उमाप, माजी नगरसेवक रविंद्र धनक, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, मार्केट कमिटीचे सभापती शशिकांत दासगुडे, आबासाहेब सरोदे, मंत्रालयाचे उपसचिव सदाशिव बेनके, आरोग्य अधिकारी बांगर, महेश ढमढेरे आणि अनिल नवले आदींचा समावेश होता.
कार्यक्रम भक्तिभावाने आणि सुसंगठित पद्धतीने पार पडला.