Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रम्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे _ प्रभाकर...

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे _ प्रभाकर कांबळे

विक्रोळी (शांताराम गुडेकर) : महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास म्हाडा, कोकण मंडळ व सिडको यांनी तयार केलेल्या सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेमध्ये 49 टक्के आरक्षण 15 घटकासाठी तर 51 टक्के आरक्षण सर्वसाधारण घटकासाठी दिले आहे .पण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नोंदीत आस्थापनेतील कामगार हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र सेवाभावी वृत्तीने कार्य करत असल्याने त्याला ” विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार”महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्या हस्ते प्रदान केला जातो पण या गुणवंत कामगारांना इतर विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारथीप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा मायबाप सरकारकडून मिळत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे.
महाराष्ट्र शासनाने म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच अपंग व्यक्तीसाठी व इतर घटकासाठी आरक्षणाचे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे गुणवंत कामगारांनाही किमान 5 ते 10 टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे (SEO) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) सन 1981 मधील नियमानुसार निरनिराळ्या गट व प्रवर्गानुसार साध्यकांचे आरक्षण करण्यात आले त्यानुसार अत्यल्प, अल्प ,मध्यम, उच्च व इतर
गटा नुसार तसेच प्रवर्गानुसारही सदनिकाची संख्या नमूद करण्यात आली आहे. यामध्ये माजी सैनिक ,पत्रकार ,कलाकार ,अपंग, खासदार आमदार मंत्री तसेच अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्ग आदींचा आरक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे पण विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कामगार विविध संस्था तसेच संघटनाच्या माध्यमातून तन-मन-धन अर्पून समाजातील सर्व घटकापर्यंत अविरतपणे कार्य करीत असतात. महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी /सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांची. वयाच्या 70 वर्षापर्यंत नियुक्ती करून त्यांना काही मोजकेच अधिकार दिलेले असून ते मरेपर्यंत समाजासाठी काम करत असतात त्याप्रमाणे त्यांना तह्यात/मरेपर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी पदावर ठेवण्यात यावे अशी मागणी गुणवंत कामगार वर्गातून करण्यात येत आहे.
तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात आलेल्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांचे वैशिष्ट्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नुकत्याच चालू असलेल्या महाडा व सिडकोच्या घराच्या सोडतीत गुणवंत कामगारासाठी किमान 5 ते 10 टक्के पर्यंत घरे राखून ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने म्हाडा, सिडको व कोकण मंडळाला देऊन त्वरित त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आग्रही मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा डावरे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत सकपाळ बाळकृष्ण तावडे ,अजय दळवी विद्याधर राणे, संजय तावडे, विनोद विचारे तानाजी निकम आ आधी गुणवंत कामगारांच्या उपस्थितीत प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments