ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कटके यांचे दुःखद निधन

मुंबई, ३ मे — धारावीसारख्या सर्वसामान्य भागातून संघर्षमय जीवन जगत आपले शिक्षण पूर्ण करून पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कटके यांचे आज शनिवार ३ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

श्री. कटके यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रातून केली. पत्रकारितेची आवड जोपासत त्यांनी मिळेल ते काम करत अनुभव घेतला आणि नंतर दैनिक पुढारी या प्रमुख वृत्तपत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अभ्यासपूर्ण वृत्तांकनामुळे आणि प्रामाणिक पत्रकारितेमुळे त्यांना ओळख आणि मान्यता मिळाली.

त्यांच्या अचानक निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांवर आलेल्या या दु:खद प्रसंगात त्यांना सावरण्याची शक्ती ईश्वर देईल, अशी प्रार्थना केली जात आहे.

Scroll to Top