ताज्या बातम्या

जलतारा कामाचा शिवडे ग्रामपंचायतीत शुभारंभ

कराड (प्रताप भणगे): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कराड पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली शिवडे (ता. कराड, जि. सातारा) येथील जलतारा कामाचा शुभारंभ मंगळवार, दि. २९ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला. या कामांतर्गत ५३ खड्ड्यांचे १००% काम पूर्ण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास कराड पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रताप पाटील साहेब, तसेच अधिकारी वर्ग, माने साहेब उपस्थित होते. लाभार्थी शेतकरी सुरेश बाजारे, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य श्री. दिनेश घाडगे, श्री. आशुतोष माळी, ग्रामविकास अधिकारी श्रीमती ज्योती जाधव, ग्राम रोजगार सहाय्यक श्री. सुधीर दीक्षित, ग्रा.पं. क्लार्क श्री. अशोक यादव, पाणीपुरवठा कर्मचारी महादेव माळी, शिपाई संतोष यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाने जलसंधारण व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Scroll to Top