ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

गावरान भाषेतील सांचीच्या वाढदिवसाचे निमंत्रण होतेय व्हायरल…

तळमावले/वार्ताहर : नेहमीच कलात्मक उपक्रम राबवणारे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे आणि सौ.रेश्मा डाकवे या दाम्पत्याच्या कन्येचा वाढदिवस 4 एप्रिलला आहे. सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात पत्रिकेचे महत्त्व तसे कमी झाले असले तरी पत्रिका छापून वाटण्यापेक्षा ती डिझाईन करुन सोशल मिडीयामार्फत आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक यांना पोहोचवण्यात अधिक प्राधान्य दिले जाते. डाकवे कुटूंबाने वाढदिवसाची आगळीवेगळी हटके डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करुन आपले मित्र, नातेवाईक यांना व्हॉटसअप, फेसबुक च्या माध्यमातून पोहोचवली आहे. अस्सल गावरान भाषेमध्ये हे निमंत्रण असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेे.
या डिजीटल पत्रिकेत म्हटले आहे,
‘‘राम राम मंडळी, तर सांगायचं मंजी आमच्या घरातल्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस शुक्रवार दि.4 एप्रिल, 2025 ला सांच्याला 7 वाजता हाय. तवा समद्यानी तिला आशीरवाद देण्यासाठी आठवणीनं या. नाटकं काय सांगायची न्हाईत, गपचिपीत याचं. वाढदिसाच्या कार्यक्रमानंतर च्या-पाण्याचा फक्कड बेत बी केलया. तवा समद्यानी न चुकता, न इसरता आमच्या घरी नक्की या..! येताय नव्हं..यालाच पायजे….!’’
तर पत्ता लिहीताना पत्रिकेत असे म्हटलंय…पत्ता माहिती हाय नव्हं: होली फॅमिली शाळंच्या मागं, बनवडी रोडला जाताना ओ..जाधव दवाखान्यापासून आत…राजनंदा अपार्टमेंट मधी, या बघा..100 टक्के वाट बघतूया..!
हे निमंत्रण सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून हटके आणि सातारी स्टाईलमध्ये मित्रपरिवाराला वाढदिवसाचे आमंत्रण दिले आहे. यामध्ये अस्सल गावरान भाषा असली त्यात आपुलकी आहे यात शंका नाही.

Scroll to Top