ताज्या बातम्या

गरीबाच्या हॉटेलवर पालिकेचा हातोडा; हॉटेल व्यवसायिक आझाद मैदानात बसले उपोषणाला…

मुंबई(रमेश औताडे) : कोरोना काळात रुग्णांना उपचार करण्यासाठी पालिकेला आमची हॉटेल चालत होती, मात्र आता आमच्या हॉटेलवर पालिका हातोडा टाकत आहे. गेल्या २० ते २५ वर्षापासून आम्ही प्रशिक्षणार्थी पोलिस, शालेय महाविद्यालय विद्यार्थी यांना माफक दरात तर कर्करोग रुग्णांना मोफत राहण्याची सोय आम्ही करत असताना आमच्यावर अन्याय का ? पंचतारांकित हॉटेल व इतर गगनचुंबी इमारती पालिकेला दिसत नाहीत का ? असा सवाल करत ” कुर्ला वॉर्ड हॉटेल आणि गेस्ट हाऊस असोसिएशन ने आपल्या कुटुंबासह आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे.

मुंबई महानगर पालिका एल विभागातील हि हॉटेल रातोरात उभी राहिली नसून २० ते २५ वर्ष सुरू असून माफक दरात व कर्करोग रुग्णांना मोफत उपलब्ध होत असताना आत्ताच हातोडा मारण्याची इच्छा पालिकेला का होत आहे ? मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष वेधून आम्हाला न्याय दिला पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

स्थानिक आमदार दिलीप लांडे व तत्कालीन नगरसेवक प्रकाश मोरे, विजू शिंदे, किरण लांडगे, सोमनाथ सांगळे, अशोक माटेकर, खासदार वर्षा गायकवाड यांनी य

Scroll to Top