ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटपस्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रकचे उद्घाटनबॉम्बे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांची कठोर भूमिकाखेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संताप

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भीमजयंती विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक

प्रतिनीधी(केतन खेडेकर) : समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानांतर्गत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो-हे यांच्या विधानभवन कक्षात आज भेट घेण्यात आली.समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या एक वही एक पेन अभियानाचे यावेळी डाॅ .गो-हे यांनी कौतुक केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रती असलेली भूमिका लक्षात घेता चळवळीत काम करणा-या
समाजसेवकांनी राज्यात ठिकठिकाणी हे अभियान राबवावेअसे आवाहन देखील त्यांनी केले .
यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे ,उपनेते राहुल लोंढे, अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार, समाजभूषण राजू झनके, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड,जेष्ठ,पत्रकार,समाजभूषण नासिकेत पानसरे, जेष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर,महेश पावसकर व
पत्रकार प्रफुल चव्हाण हे उपस्थित होते .

Scroll to Top