ताज्या बातम्या

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन

प्रतिनिधी : साताऱ्याचे भाजपचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.  यावेळी साताऱ्यात उदयनराजेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली निघाली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी ११ वाजता जलमंदिर पॅलेस येथून उदयनराजेंच्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, महेश शिंदे, जयकुमार गोरे, महायुतीचे सर्व पदाधिकारी  कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top