ताज्या बातम्या
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदनधारावीत लवकरच सुरु होणार… आंदोलनाचा धडाका धारावी बचाव आंदोलनची माहितीधारावी पुनर्विकास सर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप; ९६% रहिवासी अपात्र ठरल्याने संताप खा. वर्षा गायकवाड यांची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी; वसुलीचा खेळ थांबवण्याचे आवाहनमुंबईत कोलोरेक्टल कॅन्सरबाबत गंभीर अज्ञान; फक्त १८.९% लोकांना शौचात रक्त दिसणे हे लक्षण असल्याची माहितीछोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन; राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबईत येणाऱ्या ९८ दुधाच्या वाहनांतील १ लाख ८३ हजार लिटर दूध साठ्याची तपासणी – मंत्री नरहरी झिरवाळ


मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या दोन दिवसात मुंबईत प्रवेश करणाऱ्या दुधाच्या एकूण ९८ वाहनाची तपासणी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण ९६ लाख ०६ हजार ८३२ किंमतीच्या १ लाख ८३ हजार ३९७ लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत मध्यरात्री प्रवेश करणाऱ्या दूध वाहनांच्या तपासणीत मुलुंड चेक नाका (पूर्व), हायवे, आनंदनगर येथे १३ वाहने एक लाख ४१ हजार ६० किंमतीचा २ हजार ८३३ लिटर दुधाचा साठा, मानखुर्द (वाशी) चेक नाका येथे ४१ वाहने ३१ हजार २०० किंमतीचा ९८ हजार २१५ लिटर दुधाचा साठा, दहिसर चेक नाका येथे १९ वाहने ५३ लाख ८६ हजार ३८० किंमतीचा ८ हजार ९७७ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोळी चेक नाका येथे २५ वाहने ४० लाख ४८ हजार १९२ किंमतीचा ७३ हजार ३७२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये गाईचे दूध, पॉश्चराइज्ड होमोजेनाइज्ड टोन्ड दूध, डबल टोन्ड दूध यांचा समावेश होता. मानखुर्द येथे तपासणी दरम्यान कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने एक वाहन परत पाठविण्यात आल्याचे ही मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

Scroll to Top