ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया च्या अहवालात ” खारफुटी ” मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने चिंता

प्रतिनिधी : भारतीय वन व पर्यावरण विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल सादर करत असते. निसर्ग, हवामान, तापमान, स्वच्छ पाणी या बाबींचा विचार करता सर्वात महत्वाचे म्हणजे समुद्र व किनारपट्टी या पर्यावरणीय समतोलाबाबत ” खारफुटी ” मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असल्याची बाब या अहवालात समोर आली आहे.

सर्वात जास्त म्हणजे ठाणे जिल्ह्याने २०२१ -२३ मध्ये ९३ हेक्टर खारफुटी नष्ट केली आहे. ९३ हेक्टर खारफुटी म्हणजे ९ मुंबई आझाद मैदानांच्या आकारा एव्हडी खारफुटी नष्ट केली असल्याचे चित्र समोर आले आहे. खारफुटी ची झाडे समुद्रातील वादळ, भरती-ओहोटी आणि त्सुनामी यांसारख्या समुद्रातील गतिशीलतेविरुद्ध नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतात.

ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या तीन जिल्ह्याममध्ये ११ मुंबई आझाद मैदानां इतके क्षेत्रफळ नष्ट केले आहे . नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी “पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटच्या नावाखाली अव्यवस्थित, बेफिकीर विकास” याला दोष दिला आहे.

जमीन बळकावण्याची आणि भूमाफियांची प्रकरणे समोर आली आहेत ज्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्याची राज्य सरकारची योजना अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सरकारने याला प्राधान्य दिले पाहिजे, असे बी एन कुमार यांनी यावेळी सांगितले .

Scroll to Top