ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

काँग्रेसला मोठा धक्का; कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव 

प्रतिनिधी : महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या एकतर्फी विजयाच्या झंझावातामध्ये काँग्रेससह आघाडीतील अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून ३९,३५५ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात चव्हाण यांना १.००.१५० मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना १,३९,५५५ मते मिळाली. चव्हाण यांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण ते २०१४ पासून कराड (दक्षिण) मतदारसंघाचे आमदार होते. ७८ वर्षीय चव्हाण २०११ ते २०१४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा पराभव असून यापुढे  कराड दक्षिणचे नेतृत्व डॉ अतुल भोसले यांच्याकडे असेल,आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपा आपले वर्चस्व कायम ठेवण्यात प्रयत्नशील राहतील अशी परिस्थिती या निकालामुळे निर्माण झाली आहे.

Scroll to Top