ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

प्रसिध्द साहित्यिक, समाजसेवक व उद्योजक डॉ. शांताराम कारंडे यांना इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स चा इनोव्हेटिव्हस बिजनेसमेन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी : इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स, भारत सरकार प्रस्तुत आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद – २०२४ मध्ये नामांकन होऊन मंगळवार दि. १८ जुलै २०२४ रोजी दिल्ली येथे प्रसिध्द साहित्यिक, समाजसेवक व उद्योजक डॉ. शांताराम कारंडे यांना इनोव्हेटिव्हस बिजनेसमेन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार घेण्यासाठी डॉ. कारंडे यांना नियोजित कार्यक्रमामुळे दिल्ली येथे जाणे शक्य नसल्याने संस्थेने कुरिअर द्वारे पाठविला. तो पुरस्कार व्यावसायिक दीपक शहा यांनी बांद्रा पूर्व येथील आर्क वि शान इन्फ्राटेक लि. या त्यांच्या कार्यालयात आणून डॉ. कारंडे यांना स्वाधीन केला. त्यावेळी आर्क वि शान इन्फ्राटेक लि.चे पार्टनर  नरेश पाटील उपस्थित होते. डॉ. कारंडे हे उद्योजक असले तरी ते कवी, लेखक, संपादक, वास्तुविशारद, विकासक व मनसे नेते आहेत. त्यांचे शेकडो लेख व १५ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच डॉ. कारंडे हे फिल्मी निर्माता व दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांनी आजतागायत २४ शॉर्टफिल्म, ७ गाणी आणि १६ मराठी नाटकांची निर्मिती केली आहे. डॉ. कारंडे यांना हा २०३ वा पुरस्कार मिळाल्याने डॉ. कारंडे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Scroll to Top