ताज्या बातम्या
राष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्र प्रदेशाची आढावा व महापरिसंवाद निर्णायक बैठक तसेच पदनियुक्ती प्रदान सोहळा पुण्यात संपन्नपालकमंत्री बदलाबाबत सातारा जिल्ह्यात ना उत्सुकता.. ना पाठिंबा- संदीप पवारराज्य अन्न आयोगाच्या नियुक्त्या नियमावलीनुसारच करा – नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; पत्रकार परिषदेत पारदर्शकतेची मागणीगोविंदांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका रुग्णालयांत विशेष वॉर्ड व वैद्यकीय सुविधा द्या – भाजयुमो मुंबईची महापौरांकडे मागणीगोविंदांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका रुग्णालयांत विशेष वॉर्ड व वैद्यकीय सुविधा द्या – भाजयुमो मुंबईची महापौरांकडे मागणी

पालकमंत्री बदलाबाबत सातारा जिल्ह्यात ना उत्सुकता.. ना पाठिंबा- संदीप पवार

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पाटणचे सुपुत्र व शिवसेनेचे वजनदार नेते शंभूराज देसाई काही अपवाद वगळता सक्षमपणाने हाताळत आहेत. त्यांचे पालकमंत्री पद बदलण्याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर मध्ये वक्तव्य केले. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या विषयाला फारसं महत्त्व न देता पालकमंत्र्यांच्या नियुक्ती यापूर्वी झाली आहे.असे स्पष्ट केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पालकमंत्री बदलाबाबत ना उत्सुकता.. ना खुली चर्चा.. ना पाठिंबा..अशी अवस्था दिसून येत आहे.असे परखड मत शिवसेनेचे जावळी तालुक्यातील तरुण तडफदार शिवसैनिक संदीप पवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व माणचे सुपुत्र ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे हे महायुतीतील मंत्री आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने ते आमदार झाले आहेत. त्यांच्या आक्रमक कामकाजाच्या पद्धतीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. आता सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलण्याबाबत मंत्री गोरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तेच अडचणीत आले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडलेल्या प्रकाराने वाचाळ नव्हे तर दुष्काळवीर भाजप नेत्यांमुळेच भाजप बॅकफुटवर आली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विकास सोसायटी ठरावामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे आता गुप्तपणाने मोर्चा बांधणी सुरू झाली आहे. अशी चर्चा आहे.महायुती धर्म पाळायचा असेल तर मंत्री गोरे यांचा त्यामध्ये समावेश नको. असं खुल्या पद्धतीने शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्ते उघडपणाने बोलत आहेत. काही भाजप नेत्यांना मात्र अडचण होत असल्याने पोटातील वाक्य ओठावर येत नाही. एवढाच फरक आहे.
सध्या शिवसेनेचे नेते व राज्याचे लाडकी बहीण योजनेचे प्रेरणास्थान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे व सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा शिवसेनामय होण्याची दमदार सुरुवात झाली आहे. पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे शिवसैनिकांपेक्षा पक्ष विरहित सर्वच
ग्रामस्थ भेट देऊन समस्या सोडवून घेतात. पालकमंत्री कार्यालयातून एका वर्षात १,२३६ तक्रारीचा निपटारा झालेला आहे. जिल्हा नियोजन मंडळ व इतर बैठकांमधून सातारा जिल्ह्यातील विकास कामांकडे त्यांचं बारकाईने लक्ष आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई या अतिवृष्टी भागासोबतच पावसाळ्यात ज्या भागाला टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो.
त्या दुष्काळी माण – खटाव कडे त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच महाविकास आघाडीचे सरकार बदलल्यानंतर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शंभूराज देसाई पहिल्यांदा १४ ऑगस्ट २०२२ रोजी साताऱ्याचे पालकमंत्री झाले . २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्यावर दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी त्यांची दुसऱ्यांदा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. असेही शिवसैनिक संदीप पवार यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर नेत्यांनी संयमाने जनतेला पटेल असेच बोलावे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

—————————————
फोटो– शिवसैनिक संदीप पवार व पालकमंत्री शंभूराज देसाई

Scroll to Top