मुंबई -२४-(प्रतिनिधी )-जंतरमंतर दिल्ली येथे तसेच मुंबईत पोलिसांमार्फत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज व गैरवर्तनाच्या विरोधात तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमान्याच्या मागणीसाठी भीम आर्मी या संघटनेने उद्या शनिवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे . खासदार ऍड चंद्रशेखर आजाद यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रात राज्यभरात आंदोलने करिन राष्ट्रपतींच्या नावे निवेदने देण्यात येणार आहेत .
नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉक्रोज जनता पार्टीने नवी दिल्ली जंतरमंतर या ठिकाणी सुरु केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर केला होता, यावेळी अनेक स्त्री पुरुष आंदोलक जखमी झाले होते . पोलिसांच्या या कारवाईचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात असून अनेक राजकीय पक्ष संघटना आंदोलने करीत आहेत . भीम आर्मीचे संस्थापक व आजाद समाज पार्टीचे अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आजाद हे मागील आठवडाभरापासून जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उतरले होते . संसद भवनाच्या आवारात त्यांनी तीन दिवसांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर २५ जुलै रोजी त्यांनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून महाराष्ट्रात देखील भीम आर्मीच्या वतीने आंदोलन करून जिल्ह्याधिकारी व पोलीस प्रशासनामार्फत राष्ट्रपतींच्या नवे निवेदने दिली जाणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली .
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी राजीनामा द्यावा . आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज तसेच गैरवर्तणूक करणाऱ्या पोलिसांविरोधात कडक कारवाई करावी . मृत आंदोलक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी . जंतर मंतर तसेच मुंबईत स्त्री आंदोलकांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या व अमली पावडरच्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमकी देणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशा मागण्या भीम आर्मीने केल्या आहेत . या मागणीच्या समर्थनार्थ मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे व राज्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी कार्यालयांवर निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहेत . जनतेने या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन कांबळे यांनी केले आहे .



