ताज्या बातम्या

कराड तालुक्यात धावत्या बसमधून धुराचे लोट; PUC नियम धाब्यावर?

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यात धावणाऱ्या काही बसमधून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून प्रवासी, दुचाकीस्वार आणि रस्त्यालगतच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनांना प्रदूषण तपासणी (PUC) प्रमाणपत्र बंधनकारक असताना काही सार्वजनिक वाहनांकडूनच या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे “नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहनातून सतत काळा धूर निघत असल्यास संबंधित वाहनाची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संबंधित परिवहन विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा वाहनांवर कारवाई करून नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी सर्व वाहनधारकांनी PUC नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, नियमांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Scroll to Top