ताज्या बातम्या
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ – ॲड. आशिष शेलारसमाजसेवेच्या निःस्वार्थ प्रवासाला मानाचा मुजरा; पत्रकार बाळकृष्ण कासार यांना ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक – २०२६’ पुरस्काराने सन्मानितज्येष्ठाना बेस्ट मध्ये सवलतीच्या दरात प्रवास होणार…. सुरेश पोटे (फेस्कॉन )श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर (मुंबई ) येथे मित्र पक्ष ग्रुप आयोजित कलगी तुरा दोन नामांकित शाहिरांचा महामुकबला….छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सहा दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना लाभ

हातभट्टी दारूची माहिती लपवल्यास सरपंच, ग्रामसेवकांसह पोलिसांवर होणार कडक कारवाई; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी : गावपातळीवर बेकायदेशीरपणे चालणाऱ्या हातभट्टी दारूधंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. गावात सुरू असलेल्या हातभट्टी दारूची माहिती असूनही ती लपविणाऱ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटलांवर थेट कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिला आहे.
गावपातळीवरील अवैध दारूधंदे पूर्णपणे बंद करण्याची जबाबदारी आता स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर असेल.
गावात कुठेही हातभट्टी तयार होत असल्यास किंवा विकली जात असल्यास, त्याची माहिती तात्काळ वरिष्ठ पातळीवर देणे बंधनकारक आहे. माहिती लपवल्याचे समोर आल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल.
अवैध व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Scroll to Top