सातारा(अजित जगताप) :

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन भूमी सातारा शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमानी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळेला सातारा नगरपालिका व ग्रामीण भागातील जनतेने उदंड प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये सातशे ते आठशे छोट्या मोठ्या प्रश्नांचा निपटारा झाला. अनेकांना आवश्यक असणारे कागदपत्र मिळाल्यामुळे अनेकांचा वेळ व पैशाची बचत झाली. शहीद वीर पत्नीला त्यांच्या नावाने ही सातबारा ही देण्यात आला. कातकरी समाजालाही निवारा मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा-क्रमांक १ सातारा पोलीस करमणूक केंद्र, तालीम संघाजवळ सातारा येथे सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने सातारा नगरपालिका हद्द, सैदापूर, कोंडवे, हामदाबाद, कोडोली, शाहूपुरी परिसरातील नागरिक या शिबिरासाठी उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील , उपविभागीय अधिकारी श्री आशिष बारकुल , सातारा तहसीलदार श्री समीर यादव, नगराध्यक्ष सातारा श्री अमोल मोहिते, पंचायत समिती सभापती श्री महेश गाडे, उपनगराध्यक्ष सातारा श्री डी.जी. बनकर व सातारा नगरपालिका मुख्य अधिकारी जळक, गट विकास अधिकारी सुशील संसारे, तुषार पाटील, दत्तात्रय शिंदे, दयानंद कोळेकर, तेजदीप ढगे, गणेश बोबडे, उदय कुलकर्णी, श्रीकांत इटलोट, सचिन शेटे ,प्रशांत जाधवआणि सर्व नगरसेवक तसेच करंजे व सातारा मंडळातील सन्माननीय नागरिक आणि शासकीय कार्यालयातील अधिकारी व प्रतिनिधी संख्येने उपस्थित होते.
या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे त्यामुळे महसूल विभागाच्या सोबतच शासकीय विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढलेला आहे. शासन हे जनतेच्या सेवेसाठी असतील त्यामुळे अशा शिबिरामधून शासनाबद्दल सामान्य नागरिकांना अधिक विश्वास निर्माण होतो. याचीच प्रचिती पाहण्यास मिळाली आहे. या उपक्रमासाठी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच मंडलाधिकारी तलाठी त्याचबरोबर विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले होते त्या परिश्रमाचे चीज झाले आहे. अनेकांच्या चेहऱ्यावरती अत्यावश्यक प्रमाणपत्र मिळाले तसेच काहींना आवश्यक सातबारा मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. भाटमरळी येथील कातकरी समाजाला हक्काचे निवारा मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र प्राप्त झाल्याचे समाधान वाटले. वीर माता नलिनी राजू जाधव यांना आरफळ या ठिकाणी पाच एकर क्षेत्र ही देण्यात आले. या कार्यक्रमाला सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
————————–
फोटो– महाराज व शिबिराला कातकरी समाजाला हक्काचा निवारा व लाभार्थीने साहित्य वाटप करताना (छाया–निनाद जगताप, सातारा)




