ताज्या बातम्या

साप्ताहिकांना ऊर्जीत अवस्थेत आणण्यासाठी उद्योग मंत्र्यांना डिजिटल मीडियाचे निवेदन..

पणजी(अजित जगताप) : सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणाऱ्या साप्ताहिक सोबत आता राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष व साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष- सातारचे सुपुत्र संजय कदम यांनी साप्ताहिकांना अर्जित अवस्थेत आणण्यासाठी पणजी (गोवा) या ठिकाणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले. यावेळी डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, सतिश सावंत, विकास भोसले,सचिन भिलारे, शहाजी गुजर, प्रकाश कुंभार, संदीप पवार, सुनील वाकडे , सोमनाथ जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतात साप्ताहिकांचा इतिहास साधारण ४०० वर्षापुर्वीचा आहे आधुनिक साप्ताहिकांची सुरुवात १६ व्या शतकात युरोप मध्ये झाली.१६०५ मध्ये रिलेशन हे पहिले साप्ताहिक प्रकाशित झाले, भारतात स्वातंत्र चळवळीत साप्ताहिकांची भुमिका महत्वाची होती. साधारण
आज भारत देशात विविध भाषेमध्ये ४६ हजार साप्ताहिक आहेत. यात महाराष्ट्रात ५ ते ६ हजार शासन मान्यता साप्ताहिक आहेत.
संवादाचा मुख्य दुवा असलेली साप्ताहिक आज बदलत्या युगात डिजीटल व प्रिंट स्वरुपात कार्यरत आहेत. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता केंद्र व राज्य सरकारची भुमिका महत्वाची आहे.
अलिकडच्या काही वर्षात डिजीटल क्रांती घडली काळानरुप या मुळे प्रिंट मिडीयातील अनेक छोटी दैनिक / साप्ताहिक आज अडचणीत आली आहेत. देशातील अशा साप्ताहिकाबाबत शासनाने काही धोरणात्मक बदल करुन या साप्ताहिकांना उर्जितअवस्था प्राप्त करुन द्यावी. अशी यावेळी चर्चा करण्यात आली.
पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये दर्पन हे पहिले साप्ताहिक सुरू केले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यासोबतच त्याकडे लक्ष देऊन
केंद्र व राज्यसरकारकडे साप्ताहिकांच्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
शासन यादीवर दैनिकांना
जाहीराती दिल्या जात आहेत यात साप्ताहिकांना अत्यंत कमी प्रमाणात जाहिरात दिली जात आहे. यात सुधारणा करणे .
साप्ताहिक साठी अधिस्विकृती पत्रकार कार्ड किमान दोन असावी.
शासन पत्रकारासाठी पेन्शन देताना
१५ वर्षापासुन कार्यरत असलेल्या सर्व साप्ताहिक संपादकांना थेट पेन्शन योजनेचा लाभ मिळावा.अधिस्विकृती असलेल्या पत्रकारास शासन राज्य परिवहन बस मधुन सर्वच बस मध्ये सवलत आरक्षण मिळावे.
राज्य सरकार प्रमाणेच केंद्र सरकार अधिस्विकृती पत्रकारांना रेल्वे मधुन सवलत चालु करावी. अधिस्विकृती पत्रकारांना शासनाने टोल मध्ये सवलत द्यावी.
पत्रकारांच्या आरोग्यसाठी निधीची तरतुद असावी आणी त्याच्या मुलांना शिक्षणात सवलत असावी. साप्ताहिक पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

________________________________

फोटो– राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना साप्ताहिक संपादक संघटनेचे संजय कदम, राजा माने, अनिल पाटील, सतिश सावंत, विकास भोसले (छाया– निनाद जगताप , पणजी)

Scroll to Top