ताज्या बातम्या

बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णय

कराड(प्रताप भणगे) : शिराळा, कराड आणि पाटण तालुक्यातील १०५ गावांना बंदिस्त पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित योजनेच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सिंचन भवन, कोल्हापूर येथे पाणी चळवळीचे प्रणेते भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित प्रशासनाला लेखी पत्र देण्यात आले आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी कृष्णा खोरे कार्यालय, कोल्हापूर येथे काढण्यात येणारा ‘लाँग मार्च’ स्थगित करण्यात आल्याची माहिती पाणी संघर्ष चळवळीने दिली आहे. कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे पुढील वाटचालीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो!
पाणी संघर्ष चळवळीचा विजय असो!

Scroll to Top