मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपल्या संबंधांमुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर परांजपे यांनी बोरीवली पूर्व भागात पथदिव्यांनी लखलखाट निर्माण केला. यामुळे अंधारात चाचपडत ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय अन्न महामंडळ,
राजेंद्र नगर बोरीवली पूर्व येथील मुख्य रस्त्यावर कायम स्वरुपी अंधाराचे साम्राज्य होते, अंधाराचा फायदा घेऊन मद्यपि, समाजकंटक, रोडसाईड रोमिओ द्वारे महिलांची छेडछाड करणे व प्रातर्विधी उरकणे असे प्रकार येथे सर्रास चालू होते. स्थानिक नागरिक या प्रकारामुळे हैराण झाले होते. यासंदर्भात आमदार संजय उपाध्याय व नगरसेविका ॲड सीमा शिंदे यांच्या कडे नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर परांजपे यांनी यासंदर्भात तातडीने हालचाली करून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड व मुंबई महानगरपालिका यांच्यात समन्वय साधला तसेच सर्व आवश्यक परवानग्या नगरसेविका ॲड सीमा शिंदे यांच्या मदतीने मिळविल्या. अदानी इलेक्ट्रिसिटीने तातडीने कामाला सुरुवात केली व १० दिवसांच्या अथक प्रयत्नातून एकूण ६ नवीन पथदिव्यांचे ६ नवीन खांब बसवण्याचे काम पूर्णत्वास नेले. व त्याचे नगरसेविका ॲड सीमा शिंदे यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन झाले.
स्थानिक रहिवाशांनी त्यांनी केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेतल्याबद्दल आमदार संजय उपाध्याय, नगरसेविका ॲड सीमा शिंदे,सुधीर परांजपे यांचे आभार व्यक्त केले.व मुंबई महापालिकेच्या प्रशासनाचे अधिकारी सवाई, मुंबई अदानी इलेक्ट्रिसिटी लिमिटेड चे लेले, रवींद्र चिले या सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले..
या प्रसंगी धर्मवीर ठाकूर, सुनील माळी, डेव्हिड गणेश गणेश करे, शीला पाडगावकर, चित्रा पाडगावकर, आकाश यादव, अनिकेत यादव, विनीत उदेशी, कुमार निती व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.




