ताज्या बातम्या

ढोलकी फड तमाशा महोत्सवास नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे नवी मुंबई सानपाडा येथे दिनांक ९ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीमध्ये भव्य ढोलकी फड तमाशा महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात महाराष्ट्रातील प्रख्यात तमाशा कलावंतांनी भाग घेतला त्यांनी आपला आविष्कार सादर केला तमाशा महोत्सवाचे वैशिष्ट्य पारंपारिक तमाशा गण गवळण . भारुड . लावणी . आणि वगनाट्य . बतावणी . सादरीकरण केले
हा कार्यक्रम ९ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० रात्री १० वाजे पर्यंत चालू होता हा कार्यक्रम सिडको सेक्टर ५ गावदेवी मैदान सानपाडा नवी मुंबई येथे संपन्न झाला
०९ मार्च २०२६ रोजी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ मु. पो.नारायणगाव जिल्हा पुणे यांचे सादरीकरण झाले १० मार्च २०२६ रोजी संगीताची राणी कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ मु. पो. आगाशिव नगर दांगट वस्ती ता. कराड जिल्हा सातारा यांचे सादरीकरण झाले ११ मार्च २०२६ रोजी वगसम्राट शांताराम चव्हाण दहिवदकर लोकनाट्य तमाशा मंडळ मु. पो. दहिवद तालुका अमळनेर जिल्हा जळगाव तर १२ मार्च २०२६ रोजी तमाशा महर्षी आनंदराव महाजन लोकनाट्य तमाशा मंडळ असोदा रोड शनिपेठ जळगाव आणि १३ मार्च २०२६ रोजी तमाशा सम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ मु. पो. नारायणगाव जिल्हा पुणे यांचे सादरीकरण झाले या तमाशा महोत्सवाला नवी मुंबई करांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सानपाडा येथील गाव देवी मैदानात ग्रामीण जत्रेचे स्वरूप आले होते जत्रेमध्ये तमाशाचा फड तंबू उभा असतो तसाच या मैदाना मध्ये तंबू उभारण्यात आला होता नवी मुंबईकरांनी या तमाशा महोत्सवास एवढा भरभरून प्रतिसाद दिला की तंबूच्या बाहेरही लोकांची गर्दी पाहायला मिळाली या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड .अशीष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ढोलकी फड तमाशा महोत्सव पार पडला रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य प्रवेश होता नवी मुंबई परिसरातील रसिकांनी याचा भरपूर आनंद घेतला या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले होते फड तमाशा महोत्सव परिषदेचे अध्यक्ष संभाजी राजे जाधव हे सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाचे नियोजन करत होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई महानगरपालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले ढोलकी फड तमाशा महोत्सवातील कलाकारांनी जुन्या पद्धतीने कला सादरीकरण करावे आजही तमाशातील कलाप्रेमी ची कला पाहण्यास जनता उत्साही आहे प्रतिवर्षी तमाशा महोत्सव व्हावा व प्रेक्षकांना येण्या जाण्यासाठी सोईस्कर मैदानावर घेतला जावा जेणेकरून रेल्वे टेशन जवळ असावे अशी भावना तमाशा प्रेमी प्रेक्षकांनी व्यक्त केली.

Scroll to Top