तळदेव – १०५ गावात सलोख्याचे वातावरण राहावे. समाज बांधवांमध्ये समाजिक समरसता नांदावी. जातीय तेढ निर्माण होऊ नयेत यासाठी उपविभागीय अधिकारी वाई व १०५ गाव समाज सामाजिक संघटना यांच्या वतीने सामाजिक समरसता जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर परीक्षेत्र ज्योती क्षीरसागर मॅडम,उपविभागीय अधिकारी साळुंखे साहेब, महाबळेश्वर पोलीस उपनिरीक्षक सांडभोर साहेब मेढा पोलीस उपनिरीक्षक पाटील हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी सभापती धोंडिबा जंगम, सरपंच रामचंद्र जंगम यांनी केले.
या बैठकीचे प्रस्ताविक उपविभागीय अधिकारी साळुंखे यांनी केले… सामाजिक सलोखा का गरजेचा आहे.. कायदा आणि आपण, आणि या बैठकीचे आयोजन कशासाठी याची माहिती दिली.
संजय संकपाळ गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करताना १०५ गाव समाज व्यवस्था काय आहे. त्याची विभागवार रचना कशी आहे. सामाजिक बैठक कशी असते. समाजाच्या वतीने कोणते उपक्रम घेतले जातात. समाज व्यवस्थेची आदरयुक्त भीती कशी असते. सामाजिक सलोखा टिकण्यासाठी समाज कसे निर्णय घेतात. याची माहिती दिली आणि समाज व्यवस्था ही कायदा सुव्यबस्था राखण्याचे काम करते. त्यामुळे स्माज कोणत्याही परिस्थितीत सामाजिक समरसता बाधित होईल असे निर्णय घेतले जात नाही आणि भविष्यात घेणार नाही याची ग्वाही दिली.
३२ गाव समाजाचे माजी अध्यक्ष ह भ प धोंडीबा महाराज संकपाळ यांनी गावागावात १२ बलुतेदार गुण्या गोविंदाने कसे राहतात याची उदाहरणे दिली.
गणेशजी उतेकर यांनी समाज व्यवस्था किती मजबूत आहे. याची माहिती दिली. १०५ गावात गुन्हेगारी कमी आहे, वाद विवाद होत नाहीत. पोलीस प्रशासनाला समाज सहकार्य करतो तसे समाज सघतनेला ही पोलिसाने सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली. समाजातील काही समाज कंटक आहेत त्याना समाज व्यवस्था आळा घालत आली आहे आणि पुढे ही समाज व्यवस्था उत्तम काम करेल याची स्पष्टवोक्ती दिली.
भाऊसाहेब मोरे, बबन सकपाळ , हरिभाऊ सकपाळ आदि समाज बघाव यांनी समाजातील प्रश्न मांडले,
ज्योती क्षीरसागर मॅडम यांनी उपस्थित समाज बांधव याना मार्गदर्शन केलं. येथील समाज व्यवस्थेचे भरभरून कौतुक केले. समाज म्हणून केलेले उपक्रम स्तुत्य आहेत. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पोलीस प्रशासन मदत करेल… एकदा अनुचित प्रकार समाज व्यवस्थेला दोष लावत असेल तर अनुचित प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. गाव पातळोवर . किंवा समाजात मिटवावेत असे आवाहन केले. परस्पर विरोध दोन्ही बाजू बरोवर सत्य ही तिसरी बाजू समजून घेण्याची तयारी ठेवली की वाद मिटतात यासाठी अनेक उदाहरणे दिली.. मार्गदर्शन खूप उपयुक्त आणि छान झाले.
या सभेसाठी १०५ गाव समाजातील समाज बांधव, पोलोस पाटील, तरुण, तळदेव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच रामचंद्र जंगम यांनी आभार मानले. तळदेव ग्रामस्थानी भोजन व बैठक व्यवथा उत्तम केली.




