ताज्या बातम्या

गिरणी कामगारांचा महामोर्चा आझाद मैदानावर ! गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सरकार एवढे उदासीन का?

विशेष लेख(नारायण पांचाळ) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते व संयुक्त लढा समिती यांनी गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत म्हणून पुकारलेल्या लढ्याला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे,आज या लढ्याचे स्वरूप तीव्र होतांना दिसत आहे,संपूर्ण महाराष्ट्रातील गिरणी कामगार व त्यांचे वारसदार या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत असून १० मार्च रोजी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात उभे राहिले आहेत,९ जुलै २५ रोजी असाच एक विराट मोर्चा गिरणी कामगारांच्या आक्रोशाचा मुंबईच्या आझाद मैदानावर धडकला होता,त्यावेळी मुंबईतील धडक मोर्चाची झलक पाहूनच सरकारने या मोर्चाची दखल घेतली होती,सरकारचे अनेक मंत्री मोर्चेकऱ्यांना शांत करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर भेटीला आले व हॅव करू त्याव करू अशी फुशारकी मारून वेळ मारून निघून गेले,त्यावेळी दिल्या गेलेल्या अश्वासनाकडे त्यानंतर ढुंकूनही पाहिले नाही,तीच आठवण करून देण्यासाठी गिरणी कामगार व संयुक्त लढा समिती १० मार्चच्या भव्य दिव्य मोर्चाच्या तयारीला लागली आहेत,प्रश्न असा पडतो की,मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मतांच्या गठ्यासाठी गिरणी कामगारांना आपापल्या निवडणूक जाहीरनाम्यात गोंजारले,त्यात आजचे सरकार चालविणारे सुद्धा आहेत,मग,गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्यासाठी सरकार एवढे उदासीन का ?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळास सकारात्मक आश्वासक शब्द दिला असताना त्याची कार्यवाही होतांना अडथळे का निर्माण होत आहेत ? असा या निमित्ताने अनेकांना प्रश्न पडत आहे.
.सरकार दिवसागणिक अनेक प्रश्नांवर निर्णय जाहीर करते, मग गिरणी कामगारांच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल प्रत्येक गिरणी कामगाराला आजच्या घडीला भेडसावत आहे. गिरणी कामगार घराच्या प्रश्नांवर अनेक संस्था संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे.
गिरणी कामगार घरांच्या रखडलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष सचिन भाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी संयुक्त लढा समितीच्या पार पडलेल्या कामगार आणि वारसांच्या सभेत सरकारला अल्टिमेशन देऊन एल्गार आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांमध्ये प्रचार दौरे आयोजित करण्यात आले व त्यास उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे.गेल्या महिनाभरात सावंतवाडी, कणकवली, चिपळूण,सातारा येथे कामगार आणि वारसांच्या सभा मोठ्या संख्येने पार पडल्या.
गिरणी कामगारांवर अन्याय का?
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारा, मुंबईचा गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर मागे का? असा सवाल संयुक्त लढा।समितीने केला आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आलेल्या अनेक संकटांवर संघाने वेळोवेळच्या लढ्याद्वारे चळवळी उभ्या केल्या आहेत.

आता माघार नाही!
गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर संघटनेने व लढा समितीने जे आक्रमक पाऊल उचलले आहे,ते कदापि मागे घेतले जाणार नाही असा ठाम।निर्धार केला आहे.फॉर्म भरलेला अपात्र ठरता कामा नये.1982 नंतर कामावर आलेल्या कामगाराने एक जरी पुरावा दिला तरी तो ग्राह्य धरला पाहिजे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी तसा म्हाडाशी पत्र व्यवहार केला आहे. मुंबईत एकही गिरणी कामगार घरांच्या हक्कापासून वंचित रहाता कामा नये,हि संघटनेची भुमिका आहे

वांगणी,शेलू एवढ्या दूरवर का ? ,गिरणी कामगार हा मुंबईतच राहिला पाहिजे !

गेल्या पंधरा वर्षांपासून गिरणी कामगारांच्या अभूतपूर्व लढा सुरू आहे, मुंबईतला गिरणी कामगार आपल्या हक्कांच्या घराच्या प्रतीक्षेत असतांना,अशा गिरणी कामगारांच्या नातेवाईकांना मुंबईच्या बाहेर शेलू,वांगणी येथे घरे देण्याचे जाहीर केलेले होते मात्र,गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या रेट्यामुळे सरकारने मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते,९ जुलै च्या महामोर्चा नंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री,ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सकारात्मकरित्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू असताना मा.मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा गिरणी कामगारांची मुंबईतील घरांची मागणी पूर्ण करावी अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे.

गेली पंधरा वर्षे गिरणी कामगारांची चाललेली ससेहोलपट पाहता,अन्य गिरणी कामगार संघटनासह जर्नालिस्ट्स युनियन ऑफ महाराष्ट्राने सुद्धा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून घरांच्या या लढ्याला उत्स्फूर्तपणे पाठींबा जाहीर केला आहे, युनियनच्या वतीने गिरणी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्धार युनियनने केला आहे,जवळपास १४ लढाऊ संघटनांच्या पाठींब्याच्या जोरावर मुंबईतील घराची चळवळ दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेत आहे, सरकारने या लढ्याची व संघर्षाची दखल घेऊन गिरणी कामगारांना आता वांगणी शेलू ऐवजी मुंबईच घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा आणि कोणतेही आढेवेढे न घेता गिरणी कामगारांचे स्वप्न साकार करावे एवढीच अपेक्षा !!

Scroll to Top