कोपरखैरणे : सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, नवी मुंबई (रजि.) संचालित शारदा विद्या मंदिर प्री-स्कूल (पूर्व प्राथमिक मराठी/सेमी माध्यम) तसेच एस.व्ही.एम. इंग्लिश प्री स्कूल (इंग्रजी माध्यम) यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ आणि समाजातील विशेष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत शेतकरी समाज संघटना हॉल, पहिला मजला, सेक्टर ४-ए, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पार पडणार आहे.
लहानग्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कला सादरीकरणासह बक्षीस वितरण समारंभही होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोरखनाथ पोळ (जीवनदीप अॅक्युमिडिया व मोटिवेशनल स्पीकर) उपस्थित राहणार आहेत. तसेच मान्यवर पाहुणे म्हणून संदीपदादा म्हात्रे, राजू (रॉबीन) मढवी, कु. काजल कोंडीबा संकपाळ (सीए) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कारही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यामध्ये सौ. सविता गोरखनाथ पोळ, ॲड सायली नारायण शिंदे, सौ. चंद्रभागा शंकर मोरे, ॲड. भारती रविकांत पाटील, सौ. दिपाली सुरेश सकपाळ, कु. तीर्थदा मारुती सकपाळ आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून बाबुरावदादा संकपाळ, अंकुश बा. संकपाळ (सचिव), हरिभाऊ रा. संकपाळ (सल्लागार) आदी कार्यरत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर यांनी सर्व पालक, नागरिक तसेच मित्रमंडळींनी उपस्थित राहून लहानग्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.




