मुंबई(दत्ता खंदारे ): नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात दंत चिकित्सा विषयात पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या डॉ. स्तुती सोनावणे (वय २४) यांनी मुंबईतील अँटॉपहिल परिसरातील राहत्या घरी आत्महत्या केली. सोमवारी पालकांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी अँटॉपहिल पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. स्तुती त्यांच्या पालकांसोबत राहत होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचा स्तुतीसोबत अखेरचा संवाद झाला. सोमवारी सकाळी स्तुती कॉल उचलत नसल्याने तिच्या मैत्रिणीने पालकांना कॉल करून याबाबत सांगितले. पालकांनी स्तुतीच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही.अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश करताच स्तुती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. अँटॉपहिल पोलिसांनी स्तुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये स्तुती वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींना कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती. डॉ.स्तुती सोनावणे एक प्रतिभावान दंतवैद्य होती तिने नायर हॉस्पिटल मधून पदवी पूर्ण केली होती आणि, नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होती ती जीटीबी नगरच्या श्री दशमेश दरबार ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रॅक्टिस करत होती तिचे अवघ्या २४ व्या वर्षी निधन झाल्याने त्यांच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
डॉ.स्तुती सोनावणे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांस व्यक्तीस तात्काळ अटक करा अशी मागणी समाजातील सर्वच स्तरातून होत आहे.




