ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

ठाण्यात चार कामगार कायद्यांविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे उद्या आंदोलन

ठाणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार कायद्यांच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने उद्या गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहाबाहेर हे आंदोलन होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
या निषेध आंदोलनाचे नेतृत्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते मा. राजन राजे साहेब करणार आहेत. केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत या कायद्यांविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधी व छायाचित्रकारांनी उपस्थित राहून प्रसिद्धीस सहकार्य करावे, अशी विनंती प्रसिद्धी प्रमुख संजय दळवी यांनी केली आहे.

Scroll to Top