ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटपस्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रकचे उद्घाटनबॉम्बे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांची कठोर भूमिकाखेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संताप

श्री संत सेवा पुरस्कार 2025 ज्येष्ठ निरुपणकार रवींद्र पाठक यांना जाहीर; 5 फेब्रुवारी रोजी सज्जनगड येथे पुरस्काराचे वितरण

सातारा : श्री समर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड यांचे वतीने दिला जाणारा श्री संत सेवा पुरस्कार 2025 यावर्षी ज्येष्ठ निरूपणकार व व्याख्याते रवींद्र पाठक यांना जाहीर करण्यात आला आहे .या पुरस्काराची घोषणा नुकतीच समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली असून, हा पुरस्कार दासनवमी उत्सव काळामध्ये येत्या गुरुवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता मंडळाच्या भक्तनिवास इमारतीमध्ये विशेष कार्यक्रमाद्वारे दिला जाणार आहे, अशी माहिती समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी दिली.
हा पुरस्कार श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे .यावेळी कार्याध्यक्ष समर्थ भक्त डॉ. अच्युत गोडबोले ,जेष्ठ निरूपणकार व सज्जनगड मासिकाचे संपादक प्रा .डॉ. अजित कुलकर्णी ,ज्येष्ठ समर्थ भक्त गणपती बुवा रामदासी ,रमेश बुवा शेंबेकर रामदासी ,समर्थ भक्त विद्याधर बुवा वैशंपायन, विलासराव ताम्हणकर ,रसिकाताई ताम्हणकर यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत ज्येष्ठ निरूपणकार रवींद्र पाठक यांचे प्रवचन संपन्न झाल्यावर हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहनही श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे

Scroll to Top