ताज्या बातम्या

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीची जोरदार सरशी

पनवेल(अमोल पाटील) : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात भाजप महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 78 जागांपैकी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीने 55 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 18 जागांवर समाधान मानावे लागले. या आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा समावेश होता. मात्र अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
या निकालामुळे पनवेल महापालिकेवर भाजप महायुतीची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top