ताज्या बातम्या

आरपीआय अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी मुश्ताक बाबा

मुंबई : दलीत पँथर च्या चळवळीपासून आर पी आय आठवले गटासोबत कार्यरत असणारे जेष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सोहेल शेख, खुदुसभाई फारुखी, रफीक दाफेदार, खाजभाई शेख, अजीज शेख, सय्यद हबीब, हसीन शेख, अफजल चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले, राज्यातील पालिका निवडणुकीत आम्ही आता वेगळा प्रयोग करणार आहोत. कारण प्रत्येक महानगर पालिकेत आर पी आय ला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नाही.

Scroll to Top