मुंबई : वजन वाढण्याची समस्या हल्ली सगळ्यांना जाणवते. कारण पूर्वीची कामं करण्याची पद्धत आणि आताची पद्धत यामध्ये खूप फरक आहे. पूर्वीप्रमाणे, दिवसभरातल्या कामात शारीरिक हालचाली होत नाहीत, त्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे साधे सोपे व्यायाम केल्यानं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ही योगासनं करण्यासाठी, दिवसातून 10 मिनिटं अवश्य काढा.

ऑफिसमधून आल्यानंतर थकवा येतो त्यामुळे, अनेकजण घरी आल्यावर काहीच न करणं पसंत करतात. अशामुळे, त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. पोट पुढे येतं, शिवाय कंबर, खांदे आणि मानही दुखते. ही समस्या आत्ताच सुरू झाली असेल तर भविष्यात त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. अशा स्थितीत आतापासूनच व्यायाम सुरू करणं गरजेचं आहे. त्यासाठी दिवसातून 10 मिनिटं गरजेची आहेत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर या गोष्टी नक्की करा. यामुळे तुमचं वजन तर कमी होईलच पण तुमचं शरीर निरोगी राहण्यासही मदत होईल.
ताडासन
ताडासन तुमच्या शरीराच्या पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर आहे. ताडासनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
या योगासनामुळे पोटाची चरबी लवकर कमी होते. हे योगासन केल्यावर शरीरालाही खूप आराम मिळतो.
पद्मासन
पद्मासन शरीराची स्थिती सुधारण्यासाठी आणि पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. असं केल्यानं तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि तुमच्या पोटाचंही आरोग्य चांगलं राहतं. हे 5-10 मिनिटं करा, त्या दरम्यान तुमचं मन पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न करा.
हाडं आणि स्नायू मजबूत करण्यासाठी दंडासन हे सर्वात फायदेशीर योगासन आहे. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. या आसनामुळे शरीराला योग्य ताण मिळेल. ज्याचा उपयोग हाडं आणि स्नायू मजबूत करण्यासोबत वजन कमी करण्यासाठीही होऊ शकतो.