पाटण(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या शेती विकासाला चालना देणाऱ्या कोयना धरण शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी पूर्ण क्षमतेने जल स्थापना झाली आहे. घटस्थापनेच्या पूर्वीच आली आहे.याचे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयनानगर येथे १९६५ साली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी या कोयना धरणाला प्रशासकीय मंजुरी दिली. काही अपवाद वगळता अनेकदा हे धरण पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या कोयना धरणाची उंची १०३.०२ मीटर असून सरासरी वार्षिक पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सदर धरणाची लांबी ८०७.७२ मीटर असून हा वक्र दरवाज्यातून पाणी सोडले जाते. त्याचबरोबर चार टप्प्यांमध्ये वीज निर्मिती केली जाते. कोयना धरणामुळे बारा हजार दोनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असले तरी अनेकांच्या जीवनामध्ये वीज निर्मितीमुळे प्रकाश निर्माण करत आहे. त्याचबरोबर पर्यटन वाढीला अनुकूल नैसर्गिक साधनसामुग्री निर्माण झाल्यामुळे अनेकांना उदार निर्वाह साधन मिळाले आहे. ज्यांनी कोयना धरणासाठी त्याग केला. त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन झाले नसले तरी अनेकांना त्याचा चांगलाच लाभ मिळालेला आहे. आजही कोयना धरणाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी अनेक मान्यवर कार्यकर्ते व धरणग्रस्त पुनर्वसन विभागाच्या विभाग खात्यात हेलपाटे मारत आहेत. दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरत असले तरी धरणग्रस्तांचे प्रश्न शंभर टक्के सुटलेले नाहीत . कोयना धरणाच्या निर्मितीसाठी अभियंता एस डी धोंडेकर अभियंता व्ही. जे दांडेकर, अभियंता एन जी चितळे यांच्यासह हजारो मजुरांचे कष्ट आहेत. त्याचबरोबर कोयना धरणग्रस्तांच्या त्यागाचे ही खूप मोठे मोल आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची बातमी जलसंपदा विभागासाठी दिवाळी पूर्वीची भेट ठरली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व धरणग्रस्तांच्या ही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याबद्दलही धरणग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळू लागलेली आहे.
—————————–
फोटो– कोयना धरणाचे विहंगम दृश्य (छाया- निनाद जगताप, पाटण)