प्रतिनिधी : महाविकास आघाडी चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आरिफ (नसीम) खान यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख सन्मानिय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते फित कापून केले. त्या समयी उमेदवार आरिफ (नसीम) खान , नगरसेवक सोमनाथ सांगळे, माण-खटाव विधानसभा संपर्कप्रमुख, चांदिवली विधानसभा कक्ष संघटक कृष्णा नलावडे, महिला संघटक सौ.रेश्मा कटकधोंड, महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
