Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रमहिलांच्या सन्मानाबाबत उबाठाने भूमिका जाहीर करावी ; शायना  एन सी .......संजय राऊत...

महिलांच्या सन्मानाबाबत उबाठाने भूमिका जाहीर करावी ; शायना  एन सी …….संजय राऊत यांच्याकडून महिलांच्या अवमानाचे समर्थन

मुंबई : आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या उबाठा खासदार अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर उबाठाचे दुसरे खासदार संजय राऊत यांनी सावंत यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. महिलांच्या अवमानाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांची तोंड का बंद आहेत, असा सवाल करत शिवसेनेच्या मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांनी आज केला. महिलांबाबत उबाठाने आपली भूमिका जाहीर करावी अशी त्यांनी यावेळी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, इम्पोर्टेड माल या टिप्पणीवरुन अरविंद सावंत यांनी माफी मागितली पण संजय राऊत म्हणाले ही माफी नाही. त्यामुळे उबाठा गटाला महिलांबाबत काही मान सन्मान आहे की नाही, हे आता त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी शायना एन.सी यांनी केली. काल नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यावर आज राऊत समर्थन करत असतील तर त्यांच्या मनस्थितीवर संशय येतो, असा टोला शायना एन.सी यांनी लगावला. घडलेल्या प्रकारावर महाविकास आघाडीतील महिला नेत्यांची तोंड बंद का? ही पुरुषप्रधान मानसिकता कधी संपणार? असा सवाल शायना एन.सी यांनी केला. संजय राऊत यांना माफी मागायची असेल तर मुंबादेवीची माफी मागावी, असे त्या म्हणाल्या.

मागील वीस वर्ष आपण राजकारणात आहे.२०१४ आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला बोलावले होते. तेव्हा त्यांच्यासाठी मी लाडकी बहिण होती आता इम्पोर्टेड माल बनले का, असा संताप शायना एन.सी यांनी केली. मी मुंबईत इम्पोर्टेड नाही. मुंबईत माझा जन्म झाला असून हीच माझी कर्मभूमी आहे. मुंबादेवी माझे माहेर आहे. मी स्वाभिमानी महिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीत उमेदवारी दिली, असे त्या म्हणाल्या. कलानगरमध्ये राहणारे वरळीमधून निवडणूक लढले. त्यामुळे इम्पोर्टेड कोण आहेत असा टोला शायना एन.सी यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

मविआचे उमदेवार अमिन पटेल यांनी मतदार संघात कोणतेही विकासाचे काम केले नाही. इथल्या धोकादाय चाळींचा पुनर्विकास, कामाठीपुराचा पुनर्विकास यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशी टीका शायना एन.सी यांनी केली. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी महिला आहे लढू शकते असे नेहमी म्हणतात. मला विरोधकांनाही सांगायचे आहे की माझ्यावर मुंबादेवीचा आशीर्वाद असून मी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments