कराड(प्रताप भणगे) : कराड दक्षिण पाचवड फाटा ते येळगाव फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीत असणारे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे कचऱ्याची एवढी भीषण अवस्था आहे की त्या ठिकाणी भटकी कुत्रे हे जाऊन त्यातील कोंबडी वेस्ट मटनविष्ट खाऊन उग्रपणे येणा जाणाऱ्या प्रवाशावर हल्ला करताना दिसत आहेत कालेटेक तसेच उंडाळे धरण तसेच जागोजागी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेली दिसून येत आहेत वारंवार याबाबत बातमीला दावून देखील संबंधित कोणताच विभाग याकडे लक्ष देताना दिसत येत नाही स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लाखो कोटी रुपयांचा चुराडा होत असताना एवढ्या प्रमाणात कचरा रस्त्याच्या कडेला पडतोच कसा ग्रामपंचायत आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करतात काय हा संतप्त सवाल समाजातून येताना दिसत आहे संबंधित विभागाने याबाबत तात्काळ दखल घेण्यात यावी पालकमंत्री यांनी स्वच्छतेबाबत अनेक वेळा ताशेरे ओढले असताना देखील या कराड दक्षिण च्या रस्त्याच्या साईटला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेले दिसून येत आहेत मग शासकीय अधिकारी कर्मचारी नक्की करतात काय याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे
स्वच्छ भारत अभियान यांचे कराड दक्षिण मध्ये तीन तेरा.
RELATED ARTICLES