Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित दिवाळी...

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या गुरुवारी

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानी असतील.

दिवाळी अंकांच्या परंपरेला प्रोत्साहित करणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान केला जातो. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सेक्रेटरी परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे, असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments