मुंबई – महायुतीची भरधाव चालली आहे गाडी मग कशी निवडुन येणार महाविकास आघाडी? अशी काव्यमय सुरवात करित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी अहमदनगर जिल्हातील राहुरी तालुक्यात महायुतीच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राहुरी येथील माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.हा सत्कार सोहळा महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ठरला.यावेळी विचार मंचावर केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले,माजी खासदार डॉ.सुजय विखेपाटील,माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,रिपाइंचे श्रीकांत भालेराव,विजय वाकचौरे ,सुनिल साळवे,सुरेंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मंडळात तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा राहुरी येथे यावेळी संपन्न झाला.राहुरी तालुक्यातील जनतेने यावेळी मोठी गर्दी केली होती.ना.रामदास आठवले यांच्या स्वागतासाठी फटाक्याची भव्य आतीषबाजी करण्यात आली.

मैं मंत्री बना हु तीसरी बार और मंत्री बनता रहुंगा बारबार अशा अनेक कविता सादर करुन आपल्या भाषणातुन उपस्थितांमध्ये एक उत्साह ना.रामदास आठवले यांनी भरला.तुमचे नाव आहे शिवाजीराव कर्डीले तुम्हाला निवडून दिले असे काव्यमय अभिवचन देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणुन शिवाजीराव कर्डीले यांच्या नावाची ना.रामदास आठवले यांनी घोषणा केली.
यावेळी नगर जिल्हातील श्रीरामपुर मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी रिपाइं कार्यकर्त्यांनी केली.सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ना.रामदास आठवले हे राहुरीत माझ्या प्रचारासाठी आले होते.त्यानीच माझा प्रचाराचा शुभारंभ केल्याने मी जिंकलो होतो.यंदाच्या निवडणुकीत ना.रामदास आठवले यांचे पाय राहुरी मतदार संघाला लागले आहेत म्हणजे मी निश्चित जिंकणार असल्याची मला खात्री असल्याचा विश्वास यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी व्यक्त केला.