Sunday, September 21, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रीय मजदूर सहकारी ग्राहक संघाचा येत्या २६ ला सुवर्णमहोत्सव सोहळा,सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज...

राष्ट्रीय मजदूर सहकारी ग्राहक संघाचा येत्या २६ ला सुवर्णमहोत्सव सोहळा,सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार!

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा सहकार विभाग म्हणून गिरणगावात कार्यरत असलेल्या,राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचा शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता परेलच्या महात्मागांधी सभागृहात सुवर्ण महोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि सहकारी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक, माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने संपन्न होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सहकारी ग्राहक संघाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते भुषवतील.राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तद्दन मुंबईतील गिरणी कामगार सदस्य असलेली सहकारी संस्था आपला सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे,हे विशेष गौरवर्णीय समजण्यात येते!
ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय दिनाबामा पाटील,मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर,महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष,मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले,अपना सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके,मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था (अपना बाजारचे)चे अध्यक्ष अनिल गंगर,सहकारी भंडारचे अध्यक्ष संजय शेटे, सुपारीबाग कन्झ्युमर सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर देसाई आदी सहकारातील मान्यवरांची समारंभाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आजी,माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक,सभासद,सेवक आणि सभासदांच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा
गुणगौरव करण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते प्रास्ताविक करतील, तर
महाव्यवस्थापक विलास डांगे यांनी मोहोत्सवाच्या आयोजनात भाग घेतला आहे.गेली ५० वर्षे गिरणगावावर सहकारी संस्था,विविध सहकारी उपक्रमांद्वारे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आहे,त्या कार्याला या औचित्याने उजाळा देण्यात येईल,असे सहकारी ग्राहक संस्थेचे मार्गदर्शक आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे.संस्थेचे सर्व‌ संचालक हा सोहळा अधिक द्विगुणित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून, या प्रसंगी संस्थेची ५० वी सर्वसाधारणसभा पार पडणार असून, त्यावेळी संस्थेची माहितीपूर्ण गौरविकाही प्रकाशित करण्यात येईल!•••KNM

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments