प्रतिनिधी — महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट – मुंबई या संस्थेच्या धारावी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, छत्रपती शिवाजी राजे विद्यालय आणि पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी- झुंजार पत्रकार-साहित्यिक,नाटककार,
वादविवादपटू, प्रभावी वक्ते प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची १४० वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे चेअरमन माजी आमदार बाबुराव माने यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे,खजिनदार प्रमोद माने, प्रिन्सिपल श्रध्दा माने,प्रिन्सिपल स्वाती होलमुखे,मुख्याध्यापिका विना दोनवलकर आदी शिक्षक,प्राध्यापक, समाजसेवक दिलीप दडस आदी उपस्थित होते.यावेळेस प्रबोधनकारांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी दिलेले योगदान,समाज सुधारणांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट,एक परखड पत्रकार, विचारवंत म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षिका माधुरी घार्गे यांनी दिली.तर प्रास्ताविक विश्वास निमसे यांनी केले.समाज सुधारणा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रबोधनकारांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहणारे आहेत,असे उदगार यावेळेस बोलताना बाबुराव माने यांनी काढले.
धारावीत प्रबोधनकारांना विद्यार्थी, शिक्षकांचे जयंतीनिमित्त अभिवादन
RELATED ARTICLES