मुंबई(रमेश औताडे) : ख्रिस्ती धर्मगुरूंना करणाऱ्यांना बक्षीस देऊ असे वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हे दाखल करा. धर्मगुरूंना व चर्चेस यांना कायदेशीर संरक्षण द्या. दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. ख्रिस्ती समाजाचे नाक असलेला विल्सन जिमखाना जो शंभर वर्षाहून अधिक काळ ख्रिस्ती समाजाकडे असताना तो जैन धर्मियांना वर्ग करण्यात आला आहे तो परत करावा. या व आदी मागण्या घेऊन
सर्व पंथीय ख्रिस्ती समाज शुक्रवारी आझाद मैदानात एकवटला होता.
अखिल महाराष्ट्र ख्रिस्ती समाज चे संयोजक ॲड सिरिल दारा, रेव्ह श्रीनिवास चोपडे, डॉ लालबहादुर कांबळे, जेनीत डिसुझा, प्राध्यापक रूपस कलकत्ते, मेट्रोपॉलिटन अनिलकुमार लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार अबू आझमी, आमदार भाई जगताप, अल्पसंख्यांक समाजाचे नेते भाईजान,विविध पार्टीचे आमदार यांनी मोर्चाला भेट दिली. हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात ख्रिस्ती समाज एकवटला होता.