Friday, September 19, 2025
घरमनोरंजनशिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित संवाद नात्यांचा... ‘कविता डॉट कॉम’चा तृतीय...

शिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित संवाद नात्यांचा… ‘कविता डॉट कॉम’चा तृतीय वर्धापन दिन दिमाखात साजरा

नवी मुंबई : ‘कविता डॉट कॉम’ या नवोदित कवींना व्यासपीठ देणाऱ्या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साहित्य संघ मंदिर, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी नवी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार, कवी, लेखक राजेंद्र घरत यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ कवी, गीतकार आणि प्रभावी वक्ते प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे आणि संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात नारायण लांडगे आणि गोपाळे सर यांच्या सुसंवादातून झाली, ज्यात ‘कविता डॉट कॉम’च्या गेल्या तीन वर्षांच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा बतावणीतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. त्यानंतर संस्थेचे मावळते अध्यक्ष आणि प्रख्यात कवी अरुण म्हात्रे यांनी ‘कविता डॉट कॉम’च्या कार्याचे कौतुक करताना, नवोदित कवींना हे व्यासपीठ एक उज्वल संधी देणारे असल्याचे नमूद केले. त्यांनी यावेळी आपल्या काही कविता रसिकांसमोर सादर केल्या.कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली प्रसिद्ध कवी, गीतकार आणि प्रभावी वक्ते प्रवीण दवणे यांची मुलाखत. ही मुलाखत साहित्यिक,कवी व नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी अतिशय प्रभावीपणे घेतली. या संवादातून कवितेची निर्मिती, प्रेरणा आणि अभिव्यक्ती यांचा वेध घेत जुने अनुभवही शेअर करण्यात आले.यानंतर लहान बालकविंनी एकापाठोपाठ एक कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. या बालकवींना सुलेखनकार विलास समेळ लिखित ‘पसायदान’ सन्मानपत्र आणि एस-नॅपकिनचा पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अखेरीस निमंत्रित कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी देण्यात आली आणि त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.या सोहळा कविता डॉट कॉम चे संस्थापक अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील सर व सर्व पदाधिकारी, जीवनदीप प्रकाशनचे गोरखनाथ पोळ सर, सुयश सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ, शाहीर रूपचंद चव्हाण, वसंत जाधव, सुलेखनकार विलास समेळ, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,रंगकर्मी रवींद्र औटी सर, कोपरी गावचे समाजसेवक परशुराम ठाकूरव रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अत्यंत नेटके, शिस्तबद्ध आणि सौंदर्यपूर्ण करण्यात आले होते. ‘संवाद नात्यांचा’ हे ब्रीद जपणारा हा साहित्य सोहळा उपस्थित रसिकांच्या मनात दीर्घकाळ घर करून गेला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments